नगर-पुणे रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर-पुणे रस्त्यावर टेम्पो दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला आहे. आज सकाळी कामरगाव शिवारात अपघात झाला.

कैलास अनिल ससाणे (रा. बीड) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळी पुणे-नगर रस्त्यावर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील एक जण ठार झाला, तर त्यांच्यासोबत असलेला जोडीदार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर नगर तालुका यांनी घटनास्थळी भेट दिली.

वाहतुकीची कोंडी
नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात अपघात होताच बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाल. ही कोंडी वाढत गेल्याने काही तास नगर-पुणे रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यात बराच वेळ गेला.