दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; १ ठार, २ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि.१५) रात्री साडेनऊच्या सुमारास बोपदेव घाटातील ट्रिनिटी कॉलेजजवळ झाला. या अपघाताची नोंद कोंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रुपेश शिळीमकर (वय-२८ रा. कुरंगवाडी, ता. भोर) याचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश अंकुश किवळे (वय-२३ रा. सोमर्डी, ता. पुरंदर) आणि सौरभ शांताराम जगदाळे (वय-१३ रा. गराडे, ता. पुरंदर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वानवडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मयत रुपेश शिळीमकर हा त्याच्या दुचाकीवरुन (एमएच १२ जेडब्ल्यू ९३८१) बोपदेव घाटातून खडीमशीनकडे जात होता. तो ट्रिनिटी कॉलेज जवळ आला असता समोरून येणाऱ्या दुचाकीची (एमएच १२ पीएक्स ७३४०) धडक रुपेशच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन रुपेशचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश किवळे आणि सौरभ जगदाळे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातावेळी दोन्ही दुचाकीवरील दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते त्यामुळे रुपेश शिळीमकरच्या डोक्याला मार लागून जगीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.

सिने जगत –

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो