गंगाधम चौकात भरधाव ट्रकने दुचारीस्वाराला चिरडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडीतील गांगाधम चौक येथे एका भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

विनोद धोंडीबा लडकत ( वय ३८ रा. आई माता मंदिराजवळ, गंगा धाम चौक) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

बिबवेवाडीतील गांगाधम चौक येथे आई माता मंदिराच्या दिशेने दहा चाकी माल वाहतूक ट्रक (क्र.GJ-12 Y5482) येत होता. यावेळी या भरधव ट्रकने लडकत याच्या हीरो होंडा पॅशन दुचाकीला (क्र.MH12FS3696) जोरदार धडक दिली. त्यात तो दुचाकीस्वार ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागच्या चाका खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विनोद धोंडीबा लडकत याचा मृतदेह ताब्यात घेतला. तो शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

Loading...
You might also like