पुण्यात दुचाकीस्वारला डंपरने चिरडलं, घटना CCTV मध्ये ‘कैद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 4 वाजता हडपसर-सासवड रोडवरील भेकराईनगर येथे घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. 2 महिन्यात तुकाई दर्शन ते मंतरवाडी फाटा या तीन किलोमीटर अंतरामध्ये 4 जणांना अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

नवीन कुमार धरमसिंग नरगुंड (वय ४२ रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. अपघातानंतर चालक डंपर सोडून पळून गेला आहे. अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या भेकराईनगर येथील चौकाजवळ सासवडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरचा धक्का दुचाकीस्वारास लागल्याने दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो डंपरच्या चाकाखाली आला. त्यामुळे डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

You might also like