Theur Road Accident in Pune | थेऊर रस्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला झालेल्या विचित्र अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – थेऊर स्त्यावर दाम्पत्याच्या दुचाकीला झालेल्या विचित्र अपघातात (Theur Road Accident in Pune) पत्नीचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर पती जखमी झाला आहे. ओव्हरटेक करताना दुचाकी स्लिप झाली व विवाहित महिला टँकरच्या चाकाखाली आली आहे. हा अपघात थेऊर स्त्यावर (Theur Road Accident in Pune) झाला पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उभे राहीले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भाग्यश्री श्रीकृष्ण प्रभुणे (वय 28, रा. सिद्धेश्वर गल्ली, बारामती) असे मृत्यू झालेल्या विवाहीतीचे नाव आहे. तर त्यांचे पती श्रीकृष्ण प्रभुणे हे जखमी झाले आहेत. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. चालक अमिरजित गिर (पंजाब) याला अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण प्रभुणे हे शेतकरी (Farmers) आहेत.
ते आणि त्यांची पत्नी दुचाकीवर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी थेऊर रस्त्याने जात होते.
ते कुंजीर पाटील वस्ती फलकाजवळ आल्यानंतर टँकरला त्यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
पण, याचवेळी त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि पत्नी खाली कोसळली.
यात भाग्यश्री या टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या अंगावरून टँकर गेला वत्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.
अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Wab Title :- Theur Road Accident in Pune | The wife died on the spot in a bizarre accident involving a couple’s two-wheeler on Theur Road

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा | फेसबुक ला लाईक करा