भिगवणजवळ भीषण अपघात वडगावशेरीचा तरुण ठार , कुटुंबीय गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिगवणजवळ रविवारी पहाटे कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वडगाव शेरी येथील तरुण ठार झाला. या अपघातात त्याचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला.

अनिल मुलीया (वय ४०, रा. वाडेश्वरनगर, वडगाव शेरी) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, मुलीया कुटूंबीय हे दिवाळी सुट्टीनिमित  हैद्राबाद येथे फिरायला गेले होते. तेथून ते कारने पुण्याकडे येत होते. भिगवणच्या पुढे आले असताना त्यांच्या कारने पुढे जाणाऱ्या  एका ट्रकला जोरात धडक दिली. त्यात अनिल मुलीया यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी, मुलगा व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती समजताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या