Accident News | लग्नाला जाताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू; 5 महिला आणि 2 मुलांचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन – Accident News | बोलेरो कार आणि ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री छत्तीसगड मधील कांकेर राष्ट्रीय महामार्गावर बालोद परिसरात घडली. मृतांमध्ये दहा जण एकाच कुटुंबातील आहेत. (Accident News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री धमतरीतल्या सोरम गावातील साहू कुटुंबिय बोलेरो कारने एका लग्नासाठी मरकाटोलाला निघाले होते. कांकेर राष्ट्रीय महामार्गावर बोलोदच्या पुरूर आणि चारमा दरम्यान कार आणि ट्रकची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, साहू कुटुंबातील दहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. मृतकांमध्ये केशव साहू (३४), डोमेश ध्रुव (१९), टोमिन साहू (३३), संध्या साहू (२४), रमा साहू (२०), शैलेंद्र साहू (२२), लक्ष्मी साहू (४५), धरमराज साहू (५५), उषा साहू (५२), योग्यांश साहू (३) आणि ईशान (१.५ वर्षे) यांचा समावेश आहे. (Accident News)
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची श्रध्दांजली
मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी ट्विट करून अपघातातील मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो असे म्हणत दु:ख व्यक्त केले आहे.
Web Title :- Accident News | 11 members of the same family die in an accident on their way to a wedding; Including 5 women and 2 children
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह