Accident News | दुर्देवी ! क्रुझर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात; 11 भाविकांचा मृत्यू

जयपूर : वृत्तसंस्था – Accident News | राजस्थान (Rajasthan) येथील बिकानेरमध्ये (Bikaner) नॅशनल हायवेवर (National Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिकानेर-जोधपुर हायवेवर नोखा नागौर भागात असलेल्या श्री बालाजी गावाजवळ घडली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर (Cruiser car and trailer) जोरात टक्कर झाली. या घटनेत ११ जणांचा जीव गेला आहे.

अधिक माहितीनुसार, क्रुझर गाडी आणि ट्रेलर यांची समोरासमोर टक्कर होऊन बिकानेर-जोधपुर हायवेवर (Bikaner-Jodhpur Highway) भीषण अपघात (Accident) झाला. या झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Died) झाला आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना नोखा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. अपघातग्रस्त प्रवासी हे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सजनखेडाव दौलतपूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ते राजस्थानला देवदर्शनासाठी आले होते.

दरम्यान, राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी बिकानेर येथील झालेल्या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. ‘नागौरच्या श्री बालाजी भागात झालेल्या
भीषण रस्ते अपघातात मध्य प्रदेशला परतणाऱ्या 11 भाविकांचा झालेला मृत्यू अत्यंत दु:खद आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे, ईश्वर त्यांना या कठीण काळात शक्ती देवो आणि दिवंगत व्यक्तींच्या आत्म्यास शांती लाभो. जखमींना लवकर बरं वाटावं, यासाठी प्रार्थना’ अशा शब्दात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Accident News | bikaner rajasthan road accident 11 pilgrims died after cruiser hits trailer on national highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update