Accident News | युपीच्या बाराबंकीत भीषण अपघातात 18 ठार; थांबलेल्या बसला ट्रकने मागून धडक दिल्याने 25 जखमी

लखनौ : वृत्त संस्था – Accident News | बाराबंकी येथील रामसनेही घाटजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार झाले. हा अपघात लखनौ – अयोध्या महामार्गावर झाला. बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डबल डेकर बसला पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने जोरात धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. हरियाणाहून बिहारकडे ही डबल डेकर बस जात होती.

त्यात बहुतांशी कामगार प्रवास करीत होते. बसचा एक्सेल तुटल्याने ती लखनौ – अयोध्या महामार्गावरील कल्याणी नदीच्या पुलावर थांबली होती. त्यामुळे या बसमध्ये तसेच बसचा खाली प्रवासी झोपले होते. पाठीमागून आलेल्या ट्रकचालकाला ही बस दिसली नाही. त्याने बसला जोरात धडक दिली. त्यात पाठीमागे झोपलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यु झाला. जखमींना रुग्णालयात नेताना वाटेत ७ जणांचा मृत्यु झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना बाराबंकी तसेच लखनौमधील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, बसमध्ये झोपलेले अनेक जण आत अडकून पडले होते. त्यात अपघात झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येत होत्या.
भरपावसात भिजत पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकांमधून हॉस्पिटलमध्ये पोहचविले.

Web Titel  : Accident News | bus and truck collision in barabanki 18-passengers killed and 25 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया