विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेगेट वर कंटेनर पलटी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – येथील रेल्वे स्टेशन गेट जवळ वायर लूप घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली याठिकाणी असलेल्या सोमनाथ केंदळे यांच्या टपरीचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव होऊन मुंबईच्या दिशेने वायर लूप घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक एम एच ४१.वाय.३६४३ लासलगाव रेल्वे गेट जवळ पलटी झाली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. कंटेनर पलटी झाल्याने या ठिकाणी असलेल्या सोमनाथ केंदळे यांच्या टपरीचे नुकसान झाले आहे.

विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील या रस्त्यावरील साईट पट्टी न भरल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर पलटी झाला.