Homeक्राईम स्टोरीAccident News | दुर्देवी ! मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप उलटून...

Accident News | दुर्देवी ! मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप उलटून अपघात; पती-पत्नी जागीच ठार

बीदर : वृत्तसंस्था – Accident News | बीदर-उदगीर मार्गावर (Bidar-Udgir road) भीषण अपघात झाल्याची घटना समोर (Bidar Crime) आली आहे. मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना हा अपघात (Accident News) झाला आहे. या झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु (Died) झाला. ही घटना बुधवारी (1 नोव्हेंबर) रोजी रात्री बीदर-उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली. सूर्यकांत पाटील (वय, 50) व जयश्री पाटील (वय, 45, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असं अपघातात मृत्यु पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, सूर्यकांत पाटील (Suryakant Patil) यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह (26 डिसेंबर) रोजी आयोजित केला होता.
या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) हे दोघे बुधवारी बिदरला गेले होते.
तिथे पत्रिका वाटप करुन रात्री उशिरा भालकीकडे परतत असताना बीदर-उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात (Accident News) झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले.तर, मृत सूर्यकांत पाटील त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व भावंडे असा परिवार आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे (Bhalki MLA Eshwar Khandre) आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृत पती-पत्नीवर मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title : Accident News | the parents died on the spot while distributing the son wedding card Bhalki MLA Eshwar Khandre visit spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News