Accident News | तेरवीच्या कार्यक्रमासाठी जाताना काळाचा घाला; कार पलटी होऊन मायलेकीसह वडिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Accident News | पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. उमरी फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात (Accident News) मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर चंद्रपूर (Chandrapur) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी संध्याकाळी ८ वाजता घडली.

 

सायत्रा मोतीराम मेश्राम (वय ६५), मोतीराम भिकारी मेश्राम ( वय ७०), कमल उत्तम चूनारकर (वय ५०, सर्व रा. खापरी) अशी मृतांची नावे आहेत तर उत्तम चुनारकर (वय ४५, रा. चंद्रपूर) आणि अंकित राजू मेश्राम (वय १०, रा. खापरी) हे गंभीर जखमी (Accident News) झाले आहेत. रविवारी सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी मेश्राम कुटूंबीय आणि चुनारकर कारनं निघाले होते. उमरी फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. त्यामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Accident News | three people died in chandrapur accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ‘पॉपी स्ट्रॉ’ ड्रग्ससह तिघांना अटक

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

घाईगडबडीत कधीही रिडिम करू नका Mutual Fund, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकते पैशाचे नुकसान !

Gold Price Today | सोन्यात किरकोळ तेजी, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर