Accident News | दुर्देवी ! भाऊबीजेला मामाकडे जाताना भीषण अपघात; सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू, इतर दोघे गंभीर

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Accident News | राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊननंतर (Corona Lockdown) आलेली दिवाळी (Diwali) उत्साहात साजरी होत असताना हिंगोलीत (Hingoli) याला गालबोट लागले आहे. उद्या भाऊबीज असून बहिण-भावांचा हा सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला जातो. अशा उत्साही वातावरणात एक वाईट बातमी समोर आली आहे. हिंगोली येथे झालेल्या एका भीषण अपघातात (Accident News) भाऊबीजेपूर्वी (Bhaubeej) सख्ख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील (Wasmat taluka) टाकळगाव रोडवर हा भीषण अपघात (terrible accident) झाला आहे.
दिवाळीत मामाच्या गावी जात असताना टाटा एस मॅजिक पिकअपने (Tata S Magic Pickup) दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्या 9 वर्षाच्या भावाचा आणि 8 वर्षाच्या बहिणीचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू (Accident News) झाला.
तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
आदर्श अरविंद सूर्य Adarsha Arvind Surya (वय-9) आणि कीर्ती अरविंद सूर्य Kirti Surya (वय-8) असे अपघातात मृत्यू झालेल्या बहिण भावाची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात जखमी झालेल्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Accident News | Unfortunate! Horrible accident on the way to Mama’s brother-in-law; Number of siblings killed, two others seriously
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 36 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी