विवाहापूर्वी वरुण धवनच्या कारला अपघात, विवाहस्थळी जात होता अभिनेता : रिपोर्ट

मुंबई : वरुण-नताशाचा विवाह आज 24 जानेवारीला होणार आहे. यासाठी वरूण (varun dhawan) 23 तारीखेला अलिबागसाठी निघाला होता, परंतु रिपोर्टनुसार अलिबागसाठी प्रवास करत असताना वरुणच्या (varun dhawan)  कारला अपघात झाला. मात्र, हा अपघात खुप किरकोळ होता. यामध्ये कुणालाही दुखापत किंवा अन्य नुकसान झाले नाही. 22 जानेवारीला दोन्ही कुटुंबातील सर्व लोक विवाहासाठी अलिबागला पोहचले आहेत. तर वरुण सुद्धा 23 तारखेला अलिबागसाठी निघाला होता. आता तो सुखरूप अलिबागला पोहचला आहे.

वरुणने लग्नापूर्वी दिली पार्टी
अलिबागमध्ये वरुणच्या लग्नाची तयारी आणि मजामस्ती खुप जोरात सुरू आहे. वरूणने लग्नापूर्वी शुक्रवारी आपल्या मित्रांसोबत बॅचलर पार्टीत खुप मजा केली. पार्टीत वरुणचे काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. वरुण धवन आणि नताशाच्या विवाह सोहळ्यासाठी अनेक कलाकार अलिबागला पोहचले आहेत.

सुरक्षेची कडेकोट व्यवस्था
दोघांच्या विवाहासाठी अलिबागमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विवाहस्थळाच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गॉर्ड तैनात करण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहेत. सोबतच फॅमिलीच्या स्टाफला सेलफोन न वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.