Accident Of Shivsena MLA Car On Pune-Solapur Highway | पुणे-सोलापूर महामार्गावर शिवसेना आमदाराच्या वाहनाला अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Accident Of Shivsena MLA Car On Pune-Solapur Highway | परांडा विधानसभेचे शिवसेना आमदार (Shivsena MLA) आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या गाडीला अपघात (Accident) झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) वरवंड (Varvand) येथे हा अपघात झाला असून ते स्वत: या गाडीतून प्रवास करत होते. यवत पोलिसांनी (Yavat Police) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. आमदार तानाजी सावंत यांचे चालक सोनबा शंकर देवकाते (Driver Sonba Shankar Devkate), आमदार तानाजी सावंत व इतर काही लोक टोयोटा कपनीची लॅन्ड क्रुझर (Land Cruiser) गाडीतून पुण्याच्या दिशेने निघाले होते. (Accident Of Shivsena MLA Car On Pune-Solapur Highway)

 

तानाजी सावंत हे उस्मानाबाद (Osmanabad) व भूम परंडा (Bhum Paranda) या भागातील शिवसंपर्क अभियानाची (Shiv Sampark Abhiyan) बैठक आटोपून शनिवारी रात्री पुण्याच्या दिशेने निघाले होते. दौंड तालुक्यातील (Daund Taluka) वरवंड गावच्या हद्दीत महामार्गाच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेतील कंटेनर चालकाने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना कोणताही इशारा न देता त्याची मार्गिका सोडून कंटेनर धोकादायकरित्या अचानक उजव्या बाजूच्या मार्गिकेवर घेतल्याने आमदार सावंत यांच्या गडीच्या उजव्या बाजूला जोरात धडक बसून हा अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत आणि त्यांच्यासोबत गाडीत असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे सावंत यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपघातानंतर काही वेळाने तानाजी सावंत हे पुन्हा पुण्याच्या दिशेने निघून गेले.

 

Web Title :- Accident Of Shivsena MLA Car On Pune-Solapur Highway | accident of shiv sena leader tanaji sawants
vehicle on pune solapur highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा