पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या गाडीला अपघात

नेकनूर (बीड) : पोलीसनामा ऑनलाईन

पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघालेल्या नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या एक कर्मचारी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास मांजरसुंबा घाटात झाला.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4d2924e-ab90-11e8-a69e-219ef4ff639e’]

पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आणि पोलीस कर्मचारी महेश अधाटराव असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोंदकर आणि अधाटराव हे स्विफ्ट गाडीतून पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी जात होते. मांजरसुंबा घाटामध्ये रस्ता अरुंद असल्याने घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी गोंदकर यांच्या गाडीच्या पाठिमागे असलेल्या एका कंटेनर चालकाने कंटेनर पुढे घेत असताना कंटेनरची धडक त्यांच्या गाडीला बसली. यामुळे गाडी पुढील एसटी बसच्या मागील बाजूस गेली. यामध्ये पुढे बसलेले गोंदकर यांच्या पाठीला, मानेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर कार चालक पोलीस कर्मचारी अधाटराव यांनादेखील मार लागला आहे.

पाठलाग करुन महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग 

दोघांनाही तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमीक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बीड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत झाला असून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

You might also like