आमदाराच्या गाडीला अपघात

पोलिसांनी घेतले ट्रकचालकाला ताब्यात

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन – मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे म्हसा मार्गे मुरबाड ला येत असताना  मुरबाड म्हसा चौकात पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने  धडक दिल्याने आमदार कथोरे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असुन  या अपघातात आमदार कथोरे त्यांच्या वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी हाणी टळली.

दुपारच्या वेळेत  2.15  वाजता म्हसा परिसरातील आपली कामे उरकुन आमदार किसन कथोरे हे मुरबाड ला येत असताना मुरबाड म्हसा चौक येथे सहयोग प्लाझा समोर पाठीमागुन येणारा ट्रक क्रमांक  एम एच 12  एच.डी.  ह्या वाहनाने आमदार कथोरे यांचे वाहन क्रमांक एम.एच 05 इए 456 धडक दिली ही वार्ता पसरताच कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला अडवुन चालकाला पोलीसांचे ताब्यात दिले. तर काही काळ वाहतुक ठप्प होऊन वाहतुक कोंडी झाली होती.  पोलिसांनी ट्रकच्या चालकाला ताब्यात घेतले असुन अधिक तपास करत आहेत.