नगर-पुणे रोडवर ट्रक आणि स्कार्पिओचा भीषण अपघात ; ३ जण ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रकला पाठीमागून स्कार्पिओने जोराची धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. आज पहाटेच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात भीषण अपघात झाला.

ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय 30 रा.फिरदोसनगर, धुळे), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय 20, रा.मछली बाजार, धुळे), इरफान शयशोदोहा अन्सारी (वय 20 रा.मछली बाजार, धुळे) ही मयतांची नावे आहेत. अदनान निहाल अन्सारी (वय 21रा.तिरंगा चौक, धुळे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पुण्यावरून नगरच्या दिशेने येताना जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणा-या ट्रकला पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ गाडीने जोराची धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Loading...
You might also like