खामगाव – शेगाव रोडवर भीषण अपघातात 9 जखमी

शेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) रात्री साडे दहाच्या सुमारास खामगाव-शेगाव रोडवर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खामगाव शेगाव रोडवर इरिटीका (MH 40 AC 0725) आणि डस्टर (MH 28 Az 4739) या दोन चारचाकी वाहनांची समोर समोर धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनातील 9 जण जखमी झाले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघात ग्रस्त वाहने इरिटीका अनिल बरपात्रे यांच्या आणि डस्टर सतीश कुमार मोहता यांच्या नावावर असल्याचे समजते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात पाठवले. दरम्यान या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील जखमींची नवे समजू शकली नाहीत. प्रतिनिधींद्वारे सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like