धुळे : बसच्या भिषण अपघात 34 प्रवासी जखमी, 5 जणांची प्रकृती नाजुक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन वर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला. धुळे येथील शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर सांगवी गावाजवळील ओम पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर इंदौरहुन शिर्डीकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस जोरदार धडकली. यात एकूण 34 प्रवासी होते. प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती शिरपूर तालुका पोलीस सपोनि अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवासी बाहेर काढून उपचारार्थ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील पाच तारखेला धुळे येथील चक्कर बर्डी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

अपघाताबाबत उशिरापर्यंत शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

You might also like