धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटेच्या वेळी झाला. राजेंद्र बन्सीलाल भावसार (रा. न्याहळोद) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

भावसार हे पहोटेच्या वेळी महामार्गावरून जात असताना ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको करून तासभर महामार्ग रोकून धरला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली व महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक पुर्ववत कोली. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आझाद नगर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like