मुंबई – आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत वाघाडीचा तरुण ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. संदीप पाटील (वाघाडी, ता.शिंदखेडा) असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.

संदीप पाटील हे वैद्यकीय व्यवसायीक होते. शाळेतील कागदपत्र घेण्यासाठी दुचाकीवरून धुळ्याकडे जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनगीर टोल नाक्यावरील कर्मचारी व सोनगीर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संदीप पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. संदीप पाटील यांच्यामागे आई, वडील, भाऊ पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like