धुळे : लळिंग घाटात 3 वाहनांचा विचित्र अपघात (व्हिडिओ)

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात आज गुरूवार (दि.23) दुपारी दिड वाजेच्या दरम्यान ट्राला, कार, आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. अपघातात ट्राला चालक जखमी झाला आहे. सुदैवाने अपघातात जीवीत हानी झाली नाही.

मालेगावहुन धुळ्याकडे येणारा ट्राला कार वर आदळला तर ट्रक महामार्गाहून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या ट्राला चालकाला टोल नाक्यावरील रूग्ण वाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रेनच्या साह्याने अपघात ग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला हटवून वाहतूक पुर्ववत करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –