मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मिनी बसचा भीषण अपघात, 1 ठार तर 5 जखमी

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली इंथ भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून प्रवासी घेऊन येणाऱ्या खासगी मिनी बसने कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे महामार्गावर बंद पडलेल्या बसला मागून धडक दिली. यामुळे बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटकमधून येणाऱ्या बसमध्ये 9 लोक प्रवास करत होते. त्यातील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत तर एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दिली. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये मिनी बसचा चक्काचूर झाला आहे. बसमध्ये काही लोक अडकले होते. त्यांना पोलिसांनी आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

सोलापूर-पुणे महामार्गावर महिलेचा अपघाती मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात होण्याआधी पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला जगीच ठार झाली. तर लहान मुलगी आणि एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. जखमांना इंदापूरमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महामार्गावर कार आणि स्कुटीची धडक होऊन हा अपघात झाला. कोरोनामुळे लोक शहर सोडून आपल्या गावी जात आहेत. हा अपघातही कोरोनाच्या दहशतीमुळे झाला. मृत महिला ही महिला गावाकडे निघाली होती. मुंबईवरून कर्नाटकला जात असताना हा अपघात झाला. अद्याप ओळख पटलेली नाही.