नगर-औरंगाबाद मार्गावर स्कोडा गाडीचा अपघात, पुण्यातील १ ठार ४ जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या स्कोडा गाडी चालकाचे गाडीवरील निंयत्रण सुटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा अपघात नगर-औरंगाबाद महामार्गावर आज दुपारी तीनच्या सुमारास लिगाडे वस्ती येथे झाला.

यामध्ये लता दत्तात्रय ठाकूर (वय- ६० रा.पुणे) या महिलेचा जागेवरच मृत्यु झाला. तर जखमींमध्ये दत्तात्रय सारंग ठाकूर, आश्विन प्रशांत ठाकूर, चंद्रशेखर ठाकूर, अनिता चंद्रशेखर ठाकूर (सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-औरंगाबाद महामार्गावरून पुण्याच्या दिशेने येत असलेली स्कोडा कार चालकाचे (एमएच ०२ बीवाय १९५५) गाडीवरील नियंत्रण सुटले. कार महामार्गालगतच्या शेताच्या कंपाऊंडला जाऊन धडकली. कंपाऊंडला धडकल्यानंतर गाडी पलटी होऊन खड्ड्यात पडली. या अपघाता लता ठाकूर यांचा जगीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त कार भरधाव वेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार तीन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली. जखमींना वस्तीवरील नागरीकांनी बाहेर काढुन नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक गांगुर्डे यांनी पंचनामा केला.