नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – रक्षाबंधनासाठी कारमधून गावी जात असताना कुटुंबावर काळाने घाला घातला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याने एकाच कुटुंबील सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता संपूर्ण कार ट्रकखाली घासली गेली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

अनिल शारंधर चंडिकापुरे (वय-३२), कबीर अनिल चंडिकापुरे (वय-४), प्रज्ञा अनिल चंडिकापुरे (वय-२८), लिलाबाई शारंधर चंडिकापुरे (वय-६०) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हे मागील अनेक वर्षापासून नागपूर येथे पेंटिंगचा व्यवसाय करत होते. ते नागपूर येथे स्थायिक झाले होते. रविवार असल्याने व रक्षाबंधनासाठी हे कुटुंब त्यांच्या मुळ गावी जावळा धोत्रा येथे जात होते.
नागपूर-औरंगाबाद महामार्गावरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (एमएच ४९ यू ३४०९) कारला धडक दिली. यामध्ये संपूर्ण कार ट्रकखाली घासली गेली.

अपघाताची माहिती मिळताच तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिल आणि कबीरचा मृतदेह कारमधून बाहेर काढला. तर जखमी झालेल्या प्रज्ञा आणि लिलाबाई यांना उपचारासाठी पुलगाव येथे नेत असताना प्रज्ञाचा मृत्यू झाला. तर लिलाबाई यांचा सावगी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like