नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर अपघात; चालकासह 2 दोघे किरकोळ जखमी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास निफाड येथील कादवा नदी पुलावरून जाणाऱ्या हायवाचे हायड्रोलीक अचानक उघडल्यामुळे हायवाची केबिन ट्रॉलीसह उंच जाऊन पुलाच्या वरच्या आडव्या बीमला तिरक्या स्थितीत अडकल्याची घटना घडली हायवा अडकल्याचा व्हिडीओ सोशल मोडियावर चांगलं व्हायरल झाला यावेळी हायवाची केबिन व ट्रॉली वेगाने वर गेल्याने केबिन मधील चालक ,व इतर 2 साथीदार हे किरकोळ जखमी झाले सदर हायवाची केबिन तिरपी उंच गेल्याने केबिनमधील चालक व उर्वरित दोघांना एवढया उंचावरून खाली येणे शक्य नव्हते त्यामुळे या पुलावरून जाणारा ट्रॅक्टर व जीप हायवा शेजारी उभे करण्यात आले त्यानंतर केबिनमधील चालक व उर्वरित दोघे जण या ट्रॅक्टर व जीपच्या आधाराने खाली उतरले