साताऱ्याजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यु

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यु झाला तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. ही घटना बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशीळ गावाजवळ गांधीनगर येथे घडली.

निजामुद्दीन सौदागर व त्यांच्या कुटुंबियांचा मृतांमध्ये समावेश आहे. सौदागर कुटुंबिय हे कर्नाटकातील धारवाडचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, साडेतीन वर्षाचा लहान मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

सौदागर कुटुंबिय पुणे बंगळुरु महामार्गावरुन जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. त्यात गाडीतील ६ जणांचा जागीच मृत्यु झाला असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय