पुणे-सोलापूर महामार्गावरील मळदजवळ भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

दौंड – पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे- सोलापूर हायवेवरील मळद (ता.दौंड) गावाजवळ कार आणि दुचाकीचा भिषण अपघात होऊन ३ जण जागीच ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या मारुती इर्टीगा या गाडीचे अचानक टायर फुटल्याने ही गाडी थेट डिव्हायडर ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण आणि कार चालक असे तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावरील मळद गावाजवळ झाला असून दौंड आणि कुरकुंभ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवायचे काम सुरू होते.

Visit : Policenama.com