पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात महिला जागीच ठार

इंदापूर : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे तर काहीजण कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शहर सोडत आहे. त्यातील अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. तर काहींनी विविध मार्गाचा वापर करून आपल्या गावी जात आहे. याच दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती एक भीषण अपघात झाला असून, अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. तर लहान मुलगी आणि एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. जखमींना इंदापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आलं असून, त्यांच्यावरती उपचार सुरु आहे.

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे तसेच व हाताला काम नसल्याने अनेक लोक शहर सोडून आपल्या गावाकडे प्रवास करत आहे. या अपघातामध्ये कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे गावाकडे निघालेल्या महिलेचा बळी गेला आहे. मुंबई वरून कर्नाटकला जात असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि स्कुटीची धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. अद्याप मृत्यू आणि जखमी व्यक्तींची नावे समोर आली नाही.

गेल्या काही दिवसांपासून शहर सोडून मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांच्या अपघातांची मालिका सुरुच आहे. मागील आठ दिवसांत रस्ते अपघातामध्ये ७५ हुन अधिक मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काल उत्तरप्रदेशातील औरेया जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात घडला. दिल्ली-कोलकाता महामार्गावरील ढाब्याजवळ चहा पिण्यासाठी थांबलेल्या मजुरांनी भरलेल्या ट्रक आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. यात २४ जणांनी आपला जीव गमावला.