सिन्नर-शिर्डी रस्त्यावर साईभक्तांचा अपघात, तीन, ठार १९ गंभीर 

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील समतानगर भागातून निघालेली साइराम पालखी शिर्डीकडे पायी जात असताना या पालखीला सिन्नर शिर्डी रस्त्यावरच्या देवापूर फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात ३ ठार तर १९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना खासगी वाहनाने शिर्डीत आणले गेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत अशीही माहिती मिळते आहे.
मुंबईतील समतानगर भागात राहाणारे हे साइभक्त असून ते पायी शिर्डीला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जी मदत पोहाचायला हवी त्यास उशीर झाल्याने साई भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
15 फूट उंच साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने जोरदार धडक देत साईभक्तांना चिरडले. त्यात तीन साईभक्त ठार झाले असून 19 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून अविनाश अशोक पवार ( वय-30), अनिकेत दीपक मेहेत्रे (वय-18)अशी त्यांची नावे आहेत.
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिर्डीकडे साई नामाचा जप करीत चाललेल्या कांदवली समतानगर येथील पालखी देवपूर फाट्याच्यापुढे स्विफ्टकारने 15 फुटी देखावा असलेल्या रथाला जोरदार धडक दिली. त्यात तीन ठार झाले तर 19 साईभक्त गंभीर जखमी झाले आहे.काही जखमींना नाशिक येथे तर काहींना शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी साईभक्तांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते.