सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारच्या धडकेत दोघे ठार

सिन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यु झाला. हा अपघात खोपडी गावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी साडेसात वाजता घडला.

अनंत नवनाथ यादव (वय ३२,रा. वल्हेवाडी) व पांडुरंग नामदेव पवार  (वय ३३, रा. कहाळवाडी) असे मृत्यु पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

यादव व पवार हे मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील सुपर इंडस्ट्रीज या कारखान्यात कामगार म्हणून काम करतात. रात्रपाळी करुन ते दुचाकीवरुन सकाळी घरी जात होते. यावेळी शिर्डीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. यात या दोघा तरुणांचा जागीच मृत्यु झाला.