home page top 1

भरधाव कंटेनरनं महामार्गावरील ‘चेकपोस्ट’च उडवलं, पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचा जागीच मृत्यू (व्हिडिओ)

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापुर – धुळे महामार्ग रोडवरील येडशी उड्डाण पुलावर लावण्यात आलेला चेकपोस्ट भरधाव कंटेनरने उडवल्याची घटना आज (गुरुवार) पहाटे 3 च्या सुमारास घडली आहे.

बॅरिकेट्स तोडून कंटेनर घुसल्यामुळे या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी दिपक दिलप नाईकवाडी (वय 38 वर्ष) व होमगार्ड संतोष व्यकंट जोशी (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे तर होमगार्ड वंसत गंगाधर गाडे (वय 42) हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस येडशी येथील पोलीस कर्मचारी गिरी एच सी, गुंंड जी एन, कंकळ डी जी आणि शेवाळे एम बी यांनी घटनास्थळी जाऊन मदत केेली व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

भरधाव कंटेनरनं महामार्गावरील 'चेकपोस्ट'च उडवलं, पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचा जागीच मृत्यू

भरधाव कंटेनरनं महामार्गावरील 'चेकपोस्ट'च उडवलं, पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचा जागीच मृत्यू

Geplaatst door Policenama op Woensdag 9 oktober 2019

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like