Accident on Yamuna Expressway | यमुना एक्सप्रेसवेवर कारची ट्रकला जोरात धडक ! पुण्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Accident on Yamuna Expressway | यमुना एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर (Accident on Yamuna Expressway) आली आहे. या झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. यामधील 4 मृत हे पुण्यातील (Pune) असल्याची माहिती आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे गंभीर जखमी (Seriously injured) असून त्याच्यावर कैलास रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

 

अपघातात झालेल्या मृतांमध्ये चार महिलेचा समावेश आहे. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाच्या (Jewar Toll Plaza) अलिकडे 40 किमीच्या परिघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोरव्हिलर ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजताच महामार्गावरील काहींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात चंद्रकांत बुराडे Chandrakant Burade (वय, 68), स्वर्णा बुराडे Swarna Burade (वय, 59), मालन कुंभार Malan Kumbhar (वय, 68), रंजना पवार Ranjana Pawar (वय, 60) आणि नुवंजन मुजावर (Nuvanjan Mujawar) (वय, 53, कर्नाटक) अशी मृतांची नावे असून अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी आहे. (Accident on Yamuna Expressway)

 

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त व्यक्ती बारामतीच्या (Baramati) असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
फोरव्हिलर (Four Wheeler) ज्या ट्रकला (Truck) धडकली तो पोलिसांनी जप्त केला आहे.

 

Web Title :- Accident on Yamuna Expressway | Accident on Yamuna Expressway 4 died they are from baramati pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा