उत्‍तराखंड : भाजप नेते, शिक्षणमंत्र्याच्या मुलाचा मृत्यू

देहरादून : वृत्तसंस्था – मित्राच्या लग्नाला जाताना कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात उत्तराखंडमधील भाजपा नेते आणि मंत्री अरविंद पांडे यांच्या मुलाचा मृत्यू झाला. अंकुर अरविंद पांडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हा अपघात आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २४ वरील बेरीजवळील फरिदपूर येथे झाला.

अरविंद पांडे हे उत्तराखंडचे शिक्षणमंत्री असून त्यांचा मुलगा अंकुर कारने फरिदपूर येथे मित्राच्या लग्नाला जात होता. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात गाडीचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अंकुरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले. मात्र, उपचारापूर्वीच अंकुरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

या भीषण अपघातात अंकुर सोबत त्याच्या इतर दोन मित्रांचाही मृत्यू झाला. तर एक मित्र गंभीर जखमी झाला असून तो कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर अंकुरच्या मित्रांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

अमेरिकन डॉक्टरांनी केलं ‘ घड्याळाद्वारे ‘ हृदयरोगाचे निदान

महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली

शिक्षकांसाठी लवकरच ‘कॅशलेस आरोग्य योजना’