बीड : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

गेवराई / बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवार) गेवराई तालुक्यातील उमापूर-धोंडराई रस्त्यावरील रामनगर तांडा येथे घडली. या अपघातात संजय मारोती गीते (वय-45) यांचा जागीच मृत्यू झाला.

संजय गीते हे गेवराई येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. धोंडराई कॅम्प येथून सकाळी दहाच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून (एमएच 23 एम 4097) गेवराईकडे जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची (एमएच 23 झेड 5751) धडक गीते यांच्या दुचाकीला बसली. समोरासमोर धडक झाल्याने गीते हे खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातात गीते हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर समोरून भरधाव वेगात येणारा रितेश हाराळे हा तरुण देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालायात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com