डान्सर सपना चौधरीच्या SUV चा अ‍ॅक्सीडेंट, गुरूग्राम पोलिसांनी तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ख्रिसमसच्या रात्री हरियाणवी डान्सर सपना चौधरी यांच्या कारचा अपघात झाला. गुरुग्राम पोलिसांनी सपना चौधरी यांना त्याच्या तपासणीत सामील होण्यासाठी सांगितले आहे. या अपघातात सपना चौधरी यांचे वाहनही सामील असल्याचे पोलिसांनी सांगितले. २५ आणि २६ डिसेंबरच्या मध्यरात्री सपना चौधरी यांच्या एसयूव्ही वाहनाने गुरुग्राम (गुडगाव) च्या हीरो होंडा चौक उड्डाणपुलाखाली मिनी ट्रकला चुकीच्या पद्धतीने ओव्हर टेक केले होते. यावेळी मागून ट्रकने सपनाच्या एसयूव्हीला धडक दिली. त्यावेळी सपना चौधरी गाडीत होती की नाही याचा पोलिसांना अंदाज आला नाही. ट्रक चालकाने तक्रार दिल्यानंतर एसयुव्ही वाहनाच्या मालकाचा शोध लागला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ख्रिसमसच्या रात्री सोहना रोडवर अपघात झाला

ख्रिसमसच्या रात्री हरियाणवी डान्सर सपना चौधरी यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात सपनाची कार खराब झाली आहे. गुरुग्राममधील सोहना रोडवर सपनाच्या एसयूव्ही वाहनाला पाठीमागून वेगवान ट्रकने धडक दिली.

नंतर, सपनाने सांगितले होते की ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी ती उपस्थित नव्हती. ते वाहन त्यांचेच असले तरी. गुरुग्राम सदन पोलिस स्टेशनचे एसएचओ म्हणाले की वस्तुस्थिती उघड झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. ते म्हणाले की मिनी ट्रकच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/