ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर-नागपूर मार्गावरील वाय पॉईंटजवळ गुरुवारी (दि.10) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती.
police
police accident (वय-30 रा. कमळेश्वर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भेंडे हे नागपूर शहर पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी कार्यरत होते. गुरुवारी रात्री ड्युटी संपवून ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कळमेश्वरला घरी जात होते. त्यावेळी दहेगाव शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळील वाय पॉईंटजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या भेंडे यांना तातडीने नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला असून त्यांना 12 दिवासांचे बाळ आहे. बाळाच्या नामकरण विधीपूर्वीच काळाने बाळापासून वडिलांना हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.

Visit : Policenama.com