दक्षिणेतील अभिनेते, तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू 

 हैदराबाद : वृत्तसंस्था

ज्येष्ठ अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्णा  यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे . आज सकाळी नलगोंडा जिल्ह्यातील नरकटपल्ली-अड्डकनी महामार्गावरून जात असताना हरिकृष्णा यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

[amazon_link asins=’B07D11MDBS,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’72901455-ab48-11e8-a575-877b4b47bc50′]

अपघातावेळी ते स्वत: वाहन चालवत होते.अपघाविषयी मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असणाऱ्या कारच्या अपघातानंतर हरिकृष्णा  चालकाच्या जागेवरुन बाहेर फेकले गेले. ज्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर लगेचच सकारळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांना कामिनेनी रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी सुहासिनी आणि मुलं कल्याण राम आणि नंदमुरी तारका राम राव असा परिवार आहे. नंदमुरी यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.

६१ वर्षीय हरिकृष्णा हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मेहुणे आणि माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एन.टी. रामाराव यांचे पुत्र होते.  सध्याच्या घडीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रसिद्धीझोतात असणारा अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा त्यांचा मुलगा आहे.