ध्वजारोहणासाठी जात असलेल्या दोन एनसीसी(NCC) कॅडेट्सचा अपघाती मृत्यू

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीस भारधाव वेगात जाणाऱ्या वाहनाची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. मृत विद्यार्थी हे एनसीसी कॅडेट्स असल्याने आजच्या प्रजास्ताक दिनाच्या समारोहाला गालबोट लागले. हा अपघात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अहमदपूर जवळील काजळी हिप्परगा येथे झाला.

गोविंद दहिफळे (कवळवाडी ता. अहमदपूर) आणि पूजा भोसले (रा.किनगाव ता. अहमदपूर) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही एकाच रोडवरील गावचे असल्याने दुचाकीवरून महात्मा गांधी महाविद्यालयांकडे जात होते.

मृत विद्यार्थी हे अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाकडे जात असताना ही दुर्घटना झाली आहे. गोविंद दहिफळे आणि पूजा भोसले  हे दोघेही एकाच रोडवरील गावचे असल्याने दुचाकीवरून महात्मा गांधी महाविद्यालयांकडे जात होते. पूजा ही बीएच्या द्वितीय वर्षात तर गोविंद हा प्रथम वर्षात शिक्षण घेत होते.

या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने प्रजाकसत्ताक दिनाच्या समारोहाला गालबोट लागले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या गावात देखील शोककळा पसरली आहे.