दापोलीहून पुण्याला येणाऱ्या शिवशाहीला अपघात, 25 ते 30 प्रवासी जखमी

दापोली : पोलीसनामा ऑनलाईन

दापोलीहून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दापोली येथील माणगाव जवळ हा अपघात झाला आहे. ड्रॉयव्हरचा बस वरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समाजते आहे. या अपघातात ही बस एका बाजूला पलटी झाल्यामुळे बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत . विशेष म्हणजे हा अपघात झाल्यानंतर बसचा चालक पळून गेला आल्याची माहिती बसमधील प्रवाशांकडून मिळते आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89f0d2fa-a83e-11e8-bb50-3905ac87a54e’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाड वरून ही शिवशाही बस पुण्याला येत असताना माणगाव जवळ हा अपघात झाला. या बसचा चालक सुरवातीपासूनच वेडीवाकडी गाडी चालवता होता तसेच बाजूच्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता. माणगावाजवळ दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूला काही फूट अंतरावर जाऊन एका बाजूला पलटी झाली. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवासी भयभीत झाले. या बस मधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. पण अपघात झाल्यानंतर लगेचच बसचा ड्रायव्हर फरार झाल्याची माहिती बसमधील प्रवासी गौरवी जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान, या बसमधील जखमी प्रवाशांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर लगेचच पोलीस त्याठिकाणी आले असून पुढील तपास करीत आहेत. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती गौरवी जोशी यांनी दिली आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची तक्रार प्रवासी करत असून चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.