पोलिसांच्या वाहनाला अपघात ; पोलीस अधिकाऱ्यासह ६ जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – परेडसाठी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह ६ पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार (दि.७) सकाळी साडेपाचच्या सुमारास वर्धा-आर्वी मार्गावर घडली. जखमी पोलिसांवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी सुरु आहेत.

ठाणेदार संपत चव्हाण (वय-५२), वाहन चालक प्रमोद राऊत (वय-५२), फौजदार गोपाळ ढोले (वय-३२), अमोल बर्डे (वय-३१), सुनील मलनकर (वय-३०) सुरेश कांदे (वय-३४) आणि रविंद्र खेडेकर (वय-३१) असे जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

आर्वी-वर्धा मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. साप्ताहिक परेडसाठी विरूळ रसुलाबाद मार्गे वर्धा येथे जात असताना नांदुराजवळ गुरुवारी (दि.६) आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडले होते. अंधारात ते चालकाला दिसले नाही. त्यामुळे झाडाला धडक बसून जीप रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यावर अमरावती येथील रेडिएन्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत पोलिसांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

You might also like