तुळजापूरला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात ; १ ठार, ७ जखमी

जामखेड : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव, जुन्नर येथून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीला जामखेड येथे मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास पलटी झालेल्या क्रूझरमधील चालक जागीच ठार झाला. तर इतर ७ जण जखमी झाले आहेत.

धर्मेंद्र कोंडाजी कसबे (वय ३५, नारायणगाव, पुणे) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

तर मंगलबाई कचरू बारवे (वय ५१ चास, नारोडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), गिताबाई खंडू कडणे (वय ५५, चास नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे), मच्छिंद्र गेणुभाऊ कदम (वय ४५, चास, नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे), शंकर दत्तात्रय कदम (वय २६ मुंबई, ओंकार मच्छिंद्र कदम (वय २० चास, आंबेगाव), हौसाबाई झांबड नवले (वय ५५, खेड, जि. पुणे), वैशाली मच्छिंद्र कदम चास (वय ३५, चास, आंबेगाव जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या चास आणि धनगरवाडी येथील सात ते आठ जण तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जात होते. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास जामखेड येथे आल्यावर त्यांची क्रुझर गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर आसपासचे लोक जागे झाले. त्यानंतर त्यांनी गाडी पलटी झाल्याचे पाहिल्यावर १०८ क्रमांकावर फोन करून अॅम्ब्यूलन्स बोलविली. जखमींना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

You might also like