पाचगणी जवळ ‘शिवशाही’ बसचा भीषण अपघात ; 30 प्रवाशी जखमी, पुण्याच्या काही जणांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पाचगणी येथून पुण्यात येत असताना पाचगणी जवळ घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याची सोमवारी दुपारी घटना पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यात पुण्यातील स्वारगेट परिसरात राहणारे नागरिक जखमी झाले आहेत.
Accident

पाचगणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Accident
स्वारगेट परिसरात राहणारे नागरिक लग्न कार्यासाठी काल पाचगणी येथे गेले होते. परत पुण्याला येत होते. शिवशाही पाचगणीवरून पुण्यात येत होती. यादरम्यान बसला घाटात भीषण अपघात झाला आहे. यात जवळपास 30 ते 35 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. तर 3 ते 4 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like