प्रभू श्रीराम यांनी चिनी ‘ड्रॅगन’ला ठार मारल्याच्या छायाचित्राला ‘फोटो ऑफ द डे’ असल्याचं तैवानच्या वेबसाईटनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमध्ये चिन आणि भारतीय सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील वातावरण बिघडले आहे. भारतातील 20 सैनिक शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश चीनवर संतापला आहे, लोक त्याचा आपापल्या मार्गाने विरोध करीत आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी या प्रकरणावर शांततेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, चीनचा कट्टर शत्रू असलेल्या तैवानमधील एका न्यूज वेबसाइटने ‘फोटो ऑफ डे’ मध्ये एक फोटो निवडला आहे, ज्यामध्ये हिंदू देवता भगवान राम यांच्याद्वारे चीनी ड्रॅगनची हत्या करतानाचे दृश्य दिसत आहे. वेबसाइटने ट्विटरच्या युजर्सच्या हवाल्याने हा फोटो शेअर केला आहे आणि याला आपल्या दिवसाच्या जबरदस्त आकर्षक फोटोमध्ये समावेश केला आहे.

हॉंगकॉंगचा ट्विटर वापरकर्त्या होसलाईने आपल्या अकाऊंटवरुन हे चित्र ट्विट करत लिहिले कि, ‘एका भारतीय मित्राने या अतिशय सुंदर चीन-भारतीय योद्धाला यापूर्वीच संपविले आहे. हे ट्विट भारतीय वापरकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात शेअर केले असून हाँगकाँगचे आभार मानले. महत्वाचे म्हणजे, याक्षणी हाँगकाँगमध्ये चीनविरूद्ध जबरदस्त प्रदर्शने होत आहेत, तर तैवान आणि चीनमधील संबंधातही कटुता वाढत आहेत.