‘राहु-केतु’च्या समस्या दूर करण्यासाठी ‘नागपंचमी’च्या दिवशी ‘हे’ 4 ‘सर्वोत्तम’ उपाय करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हिंदू धर्मात नागपंचमीचे मोठे महत्त्व असून या दिवशी महिला नागदेवतेची भावाच्या रुपात पूजा करतात आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. आपल्याला माहित नसेल की नाग पंचमीचा सरळ संबंध तुमच्या कुंडलीतील राहू-केतुशी आहे. यासंबंधी जाणून घेऊया.

राहू-केतुला सापाचे प्रतीक मानले जाते. राहुला सापाचे डोके तर केतूला शेपटी मानले जाते. सापाप्रमाणे मानले जात असल्याने राहु आणि केतुच्या संबंधित समस्यांसाठी नागपंचमीचा दिवस सर्वश्रेष्ठ मानला जातो. या दिवशी दुपारच्या वेळी राहु केतु संबंधी उपाय केल्यास यासंबंधी समस्या नष्ट होतात.

कसे ओळखाल राहु केतु ची लक्षणे :

१) व्यक्ती नेहमीच गडबडीत राहतो आणि त्याच्या जीवनात अनेक गोष्टी अचानकपणे घडतात.

२) व्यक्तीला सात्विक जेवणाऐवजी नेहमीच फास्ट फूड आवडत असेल तर तो राहु केतु चा प्रभाव असू शकतो.

३) व्यक्तीचे शरीर नेहमी कोरडे राहते आणि तो प्रचंड आळशी बनतो.

४) व्यक्ती नेहमी गोष्टींना लपवतो आणि प्रत्येक काम लपूनच करतो.

राहु केतु च्या शुभ प्रभावामुळे काय होते :

१) राहु केतुचा प्रभाव शुभ असेल तर व्यक्ती कंप्यूटर च्या क्षेत्रात यशस्वी होतो.

२) व्यक्ती राजकारणात यशस्वी होतो.

३) व्यक्ती फिल्म आणि कला क्षेत्रात यशस्वी होतो.

४) व्यक्तिचे अनेक दुर्घटनांपासून रक्षण होते आणि तो समस्यांपासून वाचतो.

५) परदेश यात्रा, अनेक भाषा अवगत करणे आणि अध्यात्मिक होणे या गोष्टी राहु केतु च्या शुभ प्रभावामुळे होतात.

नागपंचमीला अशा प्रकारे मिळवा राहु-केतु च्या अशुभ प्रभावापासून सुटका :

१) राहु केतुमुळे खाण्याच्या सवयी बिघडल्या असतील तर नागपंचमीला तुळशीचे झाड लावावे आणि त्याची नियमित पूजा करावी.

२) जर भीतीची वृत्ती वाढली असेल किंवा कल्पनेची समस्या सरल तर कडुनिंबाच्या झाडावर १०८ वेळा पिवळ्या मोहरीची आहुती द्यावी.

३) राहु केतु संबंधी इतर समस्या असतील तर नागपंचमीच्या दिवशी निळ्या कपड्यांमध्ये चंदनाचा तुकडा बांधून गळ्यात घालावा.

४) राहु केतु मुळे जीवनात वारंवार चढ-उतार होत असतील तर यादिवशी सात प्रकारचे धान्य एकाच वेळी दान करावे.

आरोग्यविषयक वृत्त