अनिल कपूरच्या फिटनेसवर दिशा पटनी ‘फिदा’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा तिच्या फिटनेससंदर्भात खूपच गंभीर असल्याचे तिच्या फिटनेसवरून लक्षात येते. तिने आतापर्यंत इन्स्टाग्रामवर असंख्य फोटो पोस्ट केली आहे. यामध्ये बहुतांशी फोटो जिममध्ये वर्क आऊट करतानाचे आहेत. तिचा फिटनेस पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. दरम्यान दिशा पाटनीने बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्याचा खुलासा केला आहे.

विशेष बाब म्हणजे, या अभिनेत्रीच्या मते बॉलीवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेता टायगर श्रॉफ किंवा सलमान खान नाही, तर तिच्या मते, बॉलीवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून फिल्म इंडस्ट्रीत गेल्या कित्येक वर्षांपासून तरुण राहिलेला अभिनेता अनिल कपूर आहे. अनिल कपूरने 24 डिसेंबर रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला आहे.

दिशाने अनिल कपूरसोबत ‘मलंग’ या चित्रपटात काम केले आहे. या वयातही अनिल कपूर यांच्या फिटनेसमुळे ती खूपच प्रभावित झाली आहे. अनिल कपूरच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिशाने एक फोटो शेअर केला आहे, यात ती अनिल कपूरसोबत दिसली आहे. फोटो शेअर करताना दिशाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझा सर्वात फिटेस्ट अभिनेता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अनिल कपूरने स्वत: ला वयाच्या 64 व्या वर्षीही ज्या प्रकारे तंदुरुस्त ठेवल आहे, ते खरेच खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे दिशा देखील अनिल कपूरच्या फिटनेसवर फिदा आहे. असे असले तरी केवळ दिशाच नाही तर स्वतः टायगर श्रॉफनंही अनेक वेळा अनिल कपूरच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.