सेवाजेष्ठतेनुसार मुख्यमंत्री मीच होतो पण…..

भुसावळ : पोलीसनामा आॅनलाईन-

भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना सेवाजेष्ठतेनुसार जर विचार केला तर मीच मुख्यमंत्री होतो. मात्र पक्षाच्या आदेशानुसार चालावे लागत असल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज परत एकदा मुंख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हाॅलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13bb1ba7-97ee-11e8-9c72-df0f3ffd8041′]

नाथाभाऊ-नाथाभाऊ आहे, जरी सोशल, प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक मीडियावर खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचे चित्र रंगविले जात असले तरी असे कोणतेही गट-तट नाहीत, आणि जरी असले तरी सर्वांचा नेता नाथाभाऊच आहे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.  जळगाव महापालिका निवडणुक निकालाच्या पार्श्‍वभूमिवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली आणि पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला. महापालिकेच्या निवडणूकीत माझ्या आवाजाची क्लीप व्हायरल केली म्हणजेच माझी गरज आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रात मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणून भाजपला यश मिळाले.

मागील चाळीस वर्षापासून मी भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षे जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वतःला श्रेय मिळावे म्हणून कधी लढलो नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कोणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहिती आहे. नाथाभाऊबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिले काय आणि नाही दिले काय त्याचा काही फरक पडत नाही. ज्याला श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या. जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहे याचे श्रेय घेणाऱ्यांना शुभेच्छा असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

खालील लिंक च्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/