लातूर जिल्ह्यातील कनिष्ठ लिपिक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लातूर : पोलिसनामा ऑनलाइन – प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भात्यात फरक देयकाची तपासणी करून स्वाक्षरी देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकास २० हजार रुपयांची लाच एसीबीने रंगेहात पडकले. मुक्तार जानीमियॉ मनियार, (वय 40) असे पकडण्यात आल्याचे नाव आहे. याप्रकणी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मणियार हे गुन्हा लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस आहेत. यातील तक्रारदार यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांच्या एकून 5,04,336/- रुपयाच्या प्रवास भत्ता फरक देयकाची तपासणी करुन त्यावर स्वाक्षरी देण्यासाठी लोकसेवक मणियार यांनी देयकाच्या 5% प्रमाणे 25,000/-रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याची पडताळणी केली होती. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार सोमवारी दुपारी मणियार याना तडजोडी अंती 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई नांदेड लाच लुचपत विभाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Visit : Policenama.com