धुळे : पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलनी परिसरातील घरातून विहिरीतील इलेट्रिक मोटर चोरीस गेल्याच्या तक्रारी दाखल आहे. त्यात पश्चिम देवपुर पोलीसांनी तपास करत आज चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हाची कबुली दिली. त्यातील एक आरोपी किरण भरत हटकर पाटील वय- २४ रा. ५०० क्वार्टर समोर सुरत बायपास रोड याने लघुशंकेचे कारण सांगुन पो. स्टे. चे बाहेर घेऊन जाण्यास सांगितले.

त्याला लघुशंकेसाठी आवारात नेले असता पोलीसांची नजर चुकवून आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसुन शोध घेत आहे. अद्याप तो सापडलेला नाही. नाशिक परिक्षेञातील विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे धुळे मुक्कामी असुन पश्चिम देवपुर पोलीसांनी केलेल्या कामचुकारपणा बद्दल काय भुमिका घेतात याकडे नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like